भोर, (पुणे) : Bhor – यात्रेसाठी माहेरी जाताना महिलेची ३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह विसरलेली बॅग कपूरव्होळ येथील रिक्षाचालकाने महिलेला सुपूर्त केली आहे. (Bhor) रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर राजगड पोलिसांना रिक्षाचालकाचा सत्कार केला आहे. (Bhor)
सुनील रघुनाथ बाठे (रा. दिवळे- कपूरव्होळ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर बाठे यांनी प्रमिला सचिन शेटे (नसरापूर) यांना दागिने परत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला शेटे यांचे माहेर दिवे (सासवड, ता. पुरंदर) हे गाव आहे. त्यांच्या माहेरची यात्रा असल्याने ते नसरापूरहून रिक्षा (क्र. MH.12.RT 7485) मधून चालल्या होत्या. गुरुवारी ( ता. १३ ) त्या कापूरहोळ येथे उतरल्या. तेव्हा त्या रिक्षात बॅग विसरल्या. अन दुसऱ्या वाहनाने सासवडपर्यंत गेल्या होत्या.
थोड्या वेळानंतर कापूरहोळ चौकात रिक्षामध्ये बॅग विसरून गेल्या असल्याचे प्रमिला शेटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची तत्काळ पतीला माहिती दिली. त्यानंतर सचिन शेटे व प्रमिला यांनी रिक्षाचालकाचा परिसरात शोध घेतला मात्र रिक्षा सापडली नाही. त्यानंतर हतबल दांपत्याने राजगड पोलीस ठाण्यात जाऊन सोन्यासह बॅग हरविल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय ढावरे, ठाणे अंमलदार मयूर निंबाळकर, गणेश कुदळे, सचिन नरुटे यांनी प्रमिला शेटे यांनी वर्णनानुसार रिक्षाचालक व रिक्षाचा शोध घेतला. त्यावेळी रिक्षाचालकाला ओळखू शकते असे शेटे यांनी पोलिसांना सांगितले होते. कापूरव्होळ येथील रिक्षा स्टॉपवर तपासकामी पाठविले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र रिक्षावाला आढळून आला नाही.
दरम्यान, रिक्षाचालक सुनील बाठे नेहमीप्रमाणे रिक्षा व्यवसाय करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी व्यवसायासाठी रिक्षा बाहेर काढली असता त्यांना एक बॅग आढळून आली. त्यांनी बॅगमध्ये पहिले असता. त्यामध्ये तीन तोळे सोने व कपडे आढळून आहे. त्यानंतर बाठे यांनी तातडीने नसरापूर येथील राजगड पोलीस ठाणे गाठले. आणि संबंधित महिलेला बॅग पुन्हा परत केली. त्यावेळी सचिन शेटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर बक्षिसी देऊन प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार केला. त्यावेळी पोलिसांनीही रिक्षाचालकाच्या प्रामाणिक कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :