Bhor News : सारोळा : कापूरहोळ-भोर रस्त्याचे काम सुरू असून, रस्त्यामध्ये येणारे बंदिस्त गटार करण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखल झाल्यामुळे अपघातांना आमंत्रण दिले जात असून, रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणी प्रशासनाने दूर कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत तक्रार जाणार
भोर तालुक्यामध्ये एमआयडीसी नसल्याने तरुणांना दूरचा प्रवास करावा लागतो. त्यामध्ये रस्त्यावरील चिखल आणि खड्डे त्रासदायक ठरत आहे. यामुळे कंपनीमध्ये जाताना मानसिकता खराब झालेली असते. यामुळे त्या ठिकाणी आठ तास काम कसे करायचे असे तरुण प्रश्न करत आहेत. (Bhor News) रस्त्यावर चिखल झालेल्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी कशाप्रकारे तारेवरची कसरत करावी लागते हे समजून येते.
शिवसेना कामगार सेना प्रमुख भोर (शिंदे गट) ओंकार तांदळे लवकरच एमआयडीसी संदर्भात निवेदन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे (Bhor News) आणि त्यावेळी तालुक्यातील अनेक मुद्दे व भोर कापूरहोळ रस्त्याची होणारी गैरसोयीची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.