जीवन सोनवणे
Bhor News : भोर, (पुणे) : गावाचा विकास हा ज्यावेळी तरुणाच्या हाती जातो तेव्हा गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही. आपल्या गावाचा माझी वसुंधरा या अभियानांतर्गत देखील प्रथम क्रमांक येणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची प्रशंसा
वरवे खुर्द (ता. भोर) येथे शुक्रवारी (ता. १५) लोकसहभागातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी ग्रामस्थांनसह रमेश चव्हाण यांनी केली यावेळी वरील प्रतिपादन रमेश चव्हाण यांनी केले. (Bhor News) यावेळी गावातील स्वच्छता पाहून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्यांनी प्रशंसा देखील केली.
या वेळी तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, विजय धनवाटे, विस्तारधिकारी आमरजा दंडे, बांधकाम अभियंता इक्बाल शेख (Bhor News) उपसरपंच रोहिणी कांबळे, सदस्य महेंद्र भोरडे, आशिष भोरडे, सागर कोंडे, मंदाकिनी काकडे, अनुराधा खोंडगे, धनश्री गणोरे, ग्रामसेवक सुनील भोकरे, रणजित कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. गावच्या विकासात सहभागी होण्यासाठी तरुणांना आवाहन देखील केले.तेवढी माहिती गटविकास अधिकारी यांच्याकडून मिळेल कारण विकासकामांत प्रामाणिक तरुण सदस्यांचा सहभाग असल्यास गावामध्ये बदल घडण्यास होण्यास वेळ लागत नाही. (Bhor News) लहान मुलांमध्ये आकलनशक्ती जास्त असते. यासाठी नवनवीन होणाऱ्या आधुनिक आणि पारंपरिक प्रकल्पाचे ज्ञान मुलांना देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, स्वागतासाठी आलेल्या वरवे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी बंधाऱ्याची माहिती देखील दिली. तसेच वनराई बंधारा म्हणजे नेमके काय? (Bhor News) जनावरे, पशुपक्षी यांना पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी फायदा कसा होतो? याचे धडे प्राथमिक शाळेच्या शालेय विद्यार्थ्यांना दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : महाराष्ट्र केसरीच्या दहीहंडीला “गौतमी पाटील” थिरकणार..
Bhor news : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वेळू येथे मराठा बांधवांची सभा, दुचाकी रॅली