जीवन सोनवणे
Bhor News : भोर : देशाचा विकास आणि प्रगतीसाठी त्या देशातील विद्यार्थी जागरूक, शिक्षित आणि मूल्याधिष्ठीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जागरूक विद्यार्थी देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाला विकसित आणि शक्तिशाली बनविण्यासोबतच सर्वांगीण विकास साधण्यासाठी देखील विद्यार्थ्यांनी दक्ष असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठ विकास मंचाचे बोर्ड सदस्य डॉ. प्रशांत साठे यांनी केले.
नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्रॅम
नसरापूर येथील नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये बुधवारी (ता. १३) इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. (Bhor News) या वेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन परिषद मंडळाचे सदस्य डॉ. अनिल कुलकर्णी, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे समूह संचालक सागर सुके, विश्वस्त बाबुराव (नानासाहेब) सुके, एमबीए व एमसीएचे संचालक डॉ. तानाजी दबडे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, प्राचार्य, पंकज भोकरे, प्राचार्य किरण पवार, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. प्रशांत साठे पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा विद्यार्थ्यांना अभिमान असला पाहिजे. आपण शेतकरी आहोत, याची जाणीव आपल्याला पदोपदी असली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणातील प्रात्यक्षिकावर आधारित संकल्पना विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
डॉ. अनिल कुलकर्णी म्हणाले की, चांगले शिक्षक हीच शिक्षण संस्थेची खरी मालमत्ता आहे. विद्यार्थ्याने संस्कृती, नितीमत्ता, आदर, प्रामाणिकपणा, सचोटी, संस्कृतीचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मनिर्भर भारत आणि नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे असणार आहे.
या वेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.(Bhor News) कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दीपाली हागीर, अंकिता वालगुडे, निलेश वाडकर, डॉ. सुहास पाखरे, सुजित अभंग, विभागप्रमुख रुपांजली गायकवाड, गीता मोहीरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर ओतारी यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ गोवेकर व राम घुगे यांनी केले. आभार एमबीए व एमसीएचे संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : चिंतामणी विद्यालयाने फिरती ट्रॉफी मिळवून इतिहास घडवला : प्राचार्य नेवाळे