Bhor News : सारोळा : भोर-कापूरहोळ रस्त्याची दूरवस्था झाली असून, वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांच्या वतीने पुणे कार्यकर्ता अभियंता यांना भोर-कापूरहोळ रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु
भोर तालुक्यातील अतिशय महत्वाच्या व वर्दळ असणाऱ्या भोर-कापूरव्होळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पुलांची कामे सुरु आहेत. या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीतच, (Bhor News) सोबत वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नाही. पूर्ण रस्त्यावर चिखल असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. असे असतानाही रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून, पावसामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे.
या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या तालुक्यातील प्रवाशांना व भोर तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे अतिशय गरजेचे आहे. (Bhor News) ७ ऑगस्टपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्ती झाली नाही तर पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करुन ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा ईशारा व निवेदन पुणे कार्यकर्ता अभियंता यांना पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांच्या वतीने देण्यात आले आहे.