Bhor News : भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २६) कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली होती. यावर्षी कारखाना सुरू होणार की नाही, हा प्रश्न समोर उपस्थितांसमोर असतानाच, आमदार संग्राम थोपटे यांनी कारखाना शंभर टक्के सुरू होणार असल्याचा ठाम विश्वास सभासदांना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला.
कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न
या वेळी बोलताना राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे आमदार थोपटे म्हणाले की, राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहेत. सर्वांच्या सहकार्यातून व प्रयत्नातून कारखान्याची वाटचाल सुरू असतानाच जिल्ह्यातील काही मंडळी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कामकाजात अडचणी आणून, आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Bhor News) मात्र, ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. शेतकऱ्यांची राहिलेली एक दिली जाणार असून, कामगारांचे पगारही केले जाणार आहेत. कारखाना कोणत्याही परीस्थितीत बंद पडू न देता, १०० टक्के सुरू करणार आहे.
राजगड कारखान्याची बिकट आर्थिक परिस्थिती, रखडलेले प्रकल्प, मागील हंगामात कारखान्याचे अपुरे झालेले गाळप, जुनी यंत्रसामग्री व या पार्श्वभूमीवर येणाऱ्या हंगामात कारखाना चालू होणार किंवा नाही अशा अनेक प्रश्नांवर वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. या सभेपुढे मागील सभेत झालेल्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आला. संस्थेच्या कामकाजाविषयी संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्विकारणे व त्याची नोंद घेणे. कारखान्याची वैधानिक लेखापरीक्षक यांनी प्रमाणित केलेली ताळेबंद व नफा तोटा पत्रके स्विकारणे व त्यास मान्यता देणे. संचालक मंडळाने तयार केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाची नोंद घेणे व अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चाची नोंद घेणे व त्यास मान्यता देणे. (Bhor News) वैधानिक लेखापरीक्षकांकडून प्राप्त झालेल्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व संचालक मंडळाने सादर केलेल्या दोष दुरूस्ती अहवालास मान्यता देणे. शासनमान्य लेखापरीक्षकांच्या तालिकेमधून वैधानिक लेखापरीक्षक, अंतर्गत लेखापरीक्षक, परिव्यय लेखापरीक्षक, कॉस्ट व ऊर्जा लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे, राईट ऑफ केलेला माल व स्क्रॅप विक्री केलेल्या मालास मंजुरी देणे. अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांच्या अनुपस्थितीची नोंद घेणे. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे. असे अनेक विषय सभेपुढे मांडण्यात आले. हे विषय सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आले.
या वेळी शैलेश सोनवणे, पोपटराव सुके, सुभाष कोंढाळकर, उत्तम थोपटे, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, किसनराव सोनवणे, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी कोंडे, विकासराव कोंडे, दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर, शोभा जाधव, सुरेखा निगडे,अशोक कोंडीबा शेलार, संदीप नगीने, चंद्रकांत सागळे, निलिमा गायकवाड, सुनिल महिंद व अधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक सुनील महिंद यांनी केले तर आभार शिवाजी कोंडे यांनी मानले.