तुषार सणस
Bhor News : भोर : भोर तालुक्यातील सारोळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग सोपान साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सारोळा आणि सावरदरे या गावाची एकत्रित सोसायटी असल्याने पदाधिकारी व दोन्ही गावचे ग्रामस्थ एकत्र आले होते.
पारदर्शकपणे काम करण्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांचे प्रतिपादन
सोसायटीचे मावळते अध्यक्ष रूपेश धाडवेपाटील यांचा कार्यकाल संपल्याने अध्यक्षपदाची निवडणूक झाली. सारोळा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करतेवेळी सावरदरे गावचे सरपंच जितेंद्र साळुंखे, सोसायटी माजी अध्यक्ष रूपेश धाडवेपाटील, उद्योजक अनिल साळुंखे, (Bhor News) ॲड रमेश धाडवेपाटील, उपाध्यक्षा सुलाबाई पापळ, वैभव धाडवेपाटील, मानसिंग साळुंखे, अंकुश राजपुरे, रामदास साळुंखे, सुर्यकांत कांबळे, सुनिल चव्हाण, आण्णा आवटे, अशोक धाडवेपाटील, नारायण धाडवेपाटील, दत्ता पवार, मच्छिंद्र राजपुरे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी अविनाश कांबळे आणि सचिव नाना बाठे यांनी या निवडीचे काम पाहिले. निवड झाल्यानंतर बोलताना (Bhor News) नवनिर्वाचित सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग साळुंखे म्हणाले, शासनाच्या विविध योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून सोसायटीचे कामकाज कोणत्याही तक्रारी शिवाय आणि गटातटाचे राजकारण न करता पारदर्शकपणे ठेवून सर्वांना एकत्र घेत एकविचाराने काम करणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : घराशेजारील अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू ; परिसरात हळहळ..