जीवन सोनवणे
Bhor News : भोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छता अभियानाला दाद देत नसरापूर गावाने संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर बनवण्याचे आव्हान स्वीकारले. स्वच्छता करण्यासाठी सारा गाव एकवटला होता. यावेळी सुमारे ३५ टन कचरा गोळा करण्यात आला. तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात आला.
नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
नसरापूर येथे सरपंच सपना झोरे यांच्या उपस्थितीत रस्ता, शाळा, मंदिर परिसर स्वच्छ करून, कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात आले. या वेळी गावातील महिला, पुरुष, तरुण-तरुणी, ग्रामसेवक व गावातील पदाधिकारी उपस्थित होते. (Bhor News) या स्वच्छ्ता मोहिमेत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत सुमारे ३५ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेत स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणाला आळा बसणार असून, रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे.
स्वच्छ, सुजलाम, सुफलाम, कचरामुक्त भारत करणे, हीच देशवासीयांची गांधीजींना भावपूर्ण आदरांजली असणार आहे, असे नागरिकांकडून सांगण्यात आले. (Bhor News) या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी सी. एन. वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय धनवटे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, सर्कल अधिकारी प्रदीप जावळे, सरपंच सपना झोरे, उपसरपंच संदीप कदम, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, सदस्य गणेश दळवी, नामदेव चव्हाण, सुधीर वाल्हेकर, उषा कदम, मेघा लष्कर व ग्रामस्थ तसेच शंकरराव भेलके महाविद्यालयातील श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचा पर्यावरण पुरक उपक्रम
Bhor News : खरेदी विक्री संघाचे काम चांगल्या प्रकारे – आमदार संग्राम थोपटे