जीवन सोनवणे
Bhor News : भोर : राजगडचा २०२३-२४ चा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी मनात कोणताही संभ्रम बाळगू नये. संचालक मंडळ गाळपासाठी प्रयत्नशील असून, विरोधक राजकीय स्वार्थापोटी पत्रकार परिषद घेऊन सभासद आणि शेतकरी यांची दिशाभूल करत असल्याचे राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअमन संग्राम थोपटे यांनी सांगितले.
विरोधकांनी दिलेले निवेदन केवळ राजकीय द्वेषभावनेतून
राजगड सहकारी कारखाना निगडे (ता. भोर) येथे शनिवारी (दि.२१) शेतकरी आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे यानी राजगडच्या व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनाला उत्तर देण्यासाठी रविवारी (दि. २२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत थोपटे बोलत होते.
थोपटे पुढे म्हणाले की, राजगड सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम लवकरच सुरु करण्यात येईल. शेतकऱ्यांचे थकीत बिलाचे पैसे, कामगारांचे थकीत पगार, काम सोडलेल्या कामगारांचे पगार, ग्रॅज्युटी तसेच अन्य व्यापारी देणी देणार असून, याची सर्वस्वी जबाबदारी आमचीच आहे.(Bhor News) पण विरोधकांनी हे निवेदन केवळ राजकीय द्वेष भावनेतून दिलेले असून, केवळ प्रसिध्दीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांचा व कामगारांचा पुळका आणण्याचा नाहक प्रयत्न करत आहे. राजगड कारखान्याविषयी आपल्या सहकार्याचे आत्मपरिक्षण करावे. राजगड कारखाना लवकरच चालू गळीत हंगाम लवकरच सुरु करणार असून सर्व सभासद व ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत गाळप केला जाणार आहे.
विरोधकांची राजकीय अस्तित्वाची धडपड सुरु असल्याचे जाणवते. (Bhor News) जनतेची व सभासदांची दिशाभूल करून केवळ द्वेषात्मक राजकारण मनात धरून स्वतः प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी सदरचे निवेदन देण्याचा केविलवाना प्रयत्न झालेला आहे या गोष्टींचा आम्ही सर्व संचालक मंडळ जाहीर निषेध करत आहोत.
यावेळी पत्रकार परिषदेसाठी कारखान्याचे पोपट सुके, सुभाष कोंढाळकर, उत्तम थोपटे, सुधीर खोपडे,अरविंद सोंडकर, किसनराव सोनवणे, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी कोंडे, विकासराव कोंडे,दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर, सुरेखा निगडे, अशोक कोंडीबा शेलार, संदीप नगीने, एस के पाटील आदि उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : रायरेश्वर गडावर पोहोचले यांत्रिकी वाहन; आता यंत्राच्या साहाय्याने होणार शेतीची मशागत
Bhor News : ना तलाठी, ना बोर्ड, ना तक्रार पेटी… किकवी तलाठी कार्यालयच गायब?