जीवन सोनवणे
Bhor News : भोर : नगरपरिषद प्रशासनाने शासकीय नियमानुसार घरपट्टी कर वाढ करून, सर्व घरपट्टी मालमत्ताधारकांना सुधारित नवीन घरपट्टी करवाढ नोटीसा पाठवल्या आहेत. त्याचाच निषेध म्हणून गुरुवारी (ता. १२) सकाळी १० वाजता भोर शहरातील एसस्टी स्टॅंड ते नगरपालिका कार्यालयापर्यंत शहरातील नागरिकांनी धडक मोर्चा काढला. नगरपरिषद प्रशासनाने लादलेल्या अन्यायकारक घरपट्टी करवाढीच्या विरोधात नागरिकांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
काळे झेंडे दाखवत जाहीर निषेध
नगरपरिषदेच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी व नागरिकांच्या म्हणण्यानुसार दिलेली अन्यायकारक घरपट्टी करवाढ रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. (Bhor News) जुनी घरपट्टी लागू करा व नवीन दिलेली घरपट्टी रद्द करा, अशी मागणी प्रामुख्याने या मोर्चात करण्यात आली.
भोर नगरपालिकेने वाढीव घरपट्टी कर लादल्याने शहरातील नागरिकांनी काळे झेंडे दाखवत, हलगी, डफ, ताशा वाजवित, नगरपरिषदेच्या प्रशासनाविरूद्ध घोषणा देल्या. भोरमधील बहुसंख्य नागरिकांनी नगरपरिषदेविरुद्ध असंतोष व्यक्त करत या विराट मोर्चात सहभाग घेतला. (Bhor News) जुनी घरपट्टी पुन्हा लागू करणार का? भोरमधील जनतेने निवडून दिलेले नगरसेवक लोकांना सहकार्य करणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला विचारले.
या वेळी भोरमधील काही राजकीय पक्षांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दर्शवला. या मोर्चात प्रामुख्याने जुनी पहिली असणारी घरपट्टी कायम करावी ही मागणी प्रामुख्याने केली आहे. (Bhor News) या मोर्चात घरपट्टी करवाढीविरोधात नगरपालिकेचा “जाहीर निषेध” असे फलक देखील लावण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : खेड शिवापूर टोलनाक्यावर मनसैनिकांचे आंदोलन
Bhor News : वन अधिकारीहो, जरा लक्ष द्या; करंदीतील बिबट्याचा बंदोबस्त करा; ग्रामस्थांची आर्त साद