Bhor News : भोर : महाडकडून भोरमार्गे पुणे शहराकडे जाताना वरंध घाट लागतो. या घाटात आज फॉर्च्युनर गाडीचा अपघात झाला आहे. गाडी तब्बल २०० फूट खोली दरीत कोसळली. गाडीतून तीन जण प्रवास करत होते. ग्रामस्थांनी तत्काळ मदतीचा हात दिल्यामुळे गाडीतील तिनही प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
वरंध घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वारवंड गावाच्या हद्दीत फॉर्च्युनर गाडी समारे २०० फूट दरीत कोसळली. (Bhor News) अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतून तीन प्रवासी प्रवास करत होते. या तिघांनाही वाचवण्यात यश आले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
गाडीत सुनील गोविंद मोरे, सुरेखा सुनील मोरे आणि अशोक सुरेश कांबळे हे तिघे होते. सर्व जण पुण्यातील भैरवनगर धानोरी रोड, विश्रांतवाडी येथील राहणारे आहेत. (Bhor News) या तिघांना ग्रामस्थांनी दरीतून सुखरूप बाहेर काढले आणि जवळच्या प्राथमिक रुग्णालयात घेऊन गेले.
दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : भोरमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरी ; दुचाकीवरून चोरटे पसार, चोरटे सीसीटीव्हीत कैद..
Bhor News : शिक्षक नसलेल्या शाळांसह शिक्षण विभागाला कुलूप ठोकणार लहूनाना शेलार यांचा इशारा..