तुषार सणस
Bhor News: भोर : पुणे-सातारा महामार्गावर किकवी येथे राजगड पोलिसांच्या मदतीने ५१ लाख ६० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा शिताफीने पकडण्यात आला. ही कारवाई बुधवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता झाली. दत्तात्रय शंकर गोगावले (वय ४२) व संतोष सुभाष गोगावले (वय ४५, दोघेही रा. गोगलवाडी, ता. हवेली) अशी कारवाई करून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार अजित भुजबळ यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोघे अटकेत
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची टेम्पोमधून वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागाला मिळताच सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारा टेम्पो (क्र. एम.एच. ४८ टी. ४७१७) अडवून तपासणी केली असता, (Bhor News) टेम्पोमध्ये ५१ लाख ६० हजारांचा १३० पोती, २० खोकी गुटखा आढळून आला. हा गुटखा कर्नाटकमधील विजापूर येथून सद्दाम ऊर्फ मेहबूब कोतवाल याच्याकडून घेऊन पुणे येथे मयूर अग्रवाल याच्याकडे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली टेम्पोचालकांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह एकूण ६१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि दोघांवर गुन्हा दाखल केले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व राजगड पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, (Bhor News) सहायक उपनिरीक्षक जगदीश शिरसाठ, पोलीस हवालदार गुरु जाधव, पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, हवालदार नाना मदने, गणेश लडकत, मयूर निंबाळकर, सचिन नरुटे, राजेंद्र गव्हाणे यांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात..