जीवन सोनवणे
Bhor News : भोर : आपला आहार हा कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. तृणधान्यातून ही गरज भागविणे शक्य आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत आहे. विद्यार्थीदशेतच तृणधान्यांचे महत्त्व मुलांना कळल्यास जागरूकता वाढून, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे मत मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांनी व्यक्त केले.
तृणधान्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा उपक्रम भोर तालुक्यातील बालवडी येथील शाळेमध्ये राबविण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना तृणधान्यांची उपयुक्तता सांगताना मुख्याध्यापक शिंदे बोलत होते. (Bhor News) २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्याने, नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्याबद्दल जागरुकता वाढवणे आणि तृणधान्य उत्पादन अधिकाधिक वाढवणे, यासाठी प्रोत्साहन देणे या हेतूने तृणधान्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन महिला व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेमध्ये भरविले होते.
या कार्यक्रमास बापू निकम, रिना किंद्रे, शिक्षिका अंजना कोंढाळकर, मंगल घोलप, अश्विनी किंद्रे, निर्मला किंद्रे, सुजाता भोसले, लता फणसे, छाया गायकवाड, विद्या किंद्रे आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : आळंदी म्हातोबाची येथे श्री संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..