Bhor News : भोर : पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. याच पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कारवाई करण्याऐवजी ‘हप्ता वसूल’ करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा पोलीस कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करत अवैध व्यवसायांना चालना देण्याचे काम करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
एक पोलीस कर्मचारी ‘हप्ता वसूल’ करण्यात मग्न असल्याचा नागरिकांचा आरोप
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किकवी, दिवळे भागात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताने अवैध धंदेवाल्यांनी आपले पाय रोवले असून, मोठ्या प्रमाणात ऑनलाइन मटका सुरू आहे. विशेष म्हणजे या सर्व बाबींचा अधिकाऱ्यांना थांगपत्ताही नाही.(Bhor News) पोलीस निरीक्षक घोलप व पोलीस अधीक्षक अंकित गोयल या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिरवळ भागातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून बिंगो नावाच्या मटक्याने जोर धरला होता. पोलिसांनी धडक कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले; परंतु आता या व्यवसायाने पोलीस कर्मऱ्याला हाताशी धरून किकवी व दिवळे परिसरात पाय पसरायला सुरुवात केली आहे. (Bhor News) सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे. मात्र, संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बिंगो चालकांनी आपला व्यवसाय वाढवला असून, आता हा ऑनलाईन मटका अँड्रॉइड मोबाईलवर खेळता येऊ शकेल अशी नवीन शक्कल लढवली आहे. या ऑनलाईन बिंगो मटक्याला शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक बळी पडत असल्याचे दिसून येत असून, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिक करत आहेत. (Bhor News) काही लोक व्यसनाधीनही झाले असून, घराघरात पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत आहेत. यावर राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करतील का, अशी दबकी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
जमिनीच्या प्रकरणांमध्ये वाढता हस्तक्षेप…
मागील काही दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमिनविषयक प्रकरणांमध्ये या कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप वाढलेला दिसून येत आहे. (Bhor News) प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना एखाद्याची बाजू घेऊन दुसऱ्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे नेमका न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : खेड शिवापूर टोल नाक्यावर चालक दिन साजरा
Bhor News : वरंध घाटात फॉर्च्युनर कार तब्बल २०० फूट दरीत कोसळली; तिनही प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश