जीवन सोनवणे
Bhor News : भोर : आम्हाला आज लय भारी वाटतंय… आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली, तरी आता चिंता नाही. आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही… नवीकोरी गुलाबी रंगाची सायकल हातात धरून मोठ्या आनंदात विद्यार्थिनी संवाद साधत होत्या. बोलता-बोलता सायकलची घंटी वाजवणाऱ्या त्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
ओमकारा आणि जनकल्याण फाउंडेशन यांच्या सहयोगाने सायकलींचे वाटप
सावरदरे (ता. भोर) येथील सरपंच जितेंद्र साळुंखे यांनी पुणे येथील ओमकारा सोशल फाउंडेशन आणि जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने मोफत सायकल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. (Bhor News) गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी धावपळ आणि फरपट याचाच विचार करत सावरदरे गावचे सरपंच जितेंद्र साळुंखे यांनी पुणे येथील ओमकारा सोशल फाउंडेशन आणि जनकल्याण फाउंडेशन यांच्या सहयोगाने ३४ सायकली, एक स्ट्रेचर, एक व्हील चेअर, एक वॉकर या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी माजी पोलीस अधिकारी दिलीप साळुंखे, माजी अध्यक्ष विलास साळुंखे, उद्योजक अनिल साळुंखे, भरत साळुंखे, ग्रापपंचायत सदस्य गणेश साळुंखे, (Bhor News) विशाल साळुंखे, संतोष जाधव, ओंकारा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष भाई ताम्हाणे, जनकल्याण फाउंडेशनचे संतोष जाधव, अमर जेधे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, विद्या ठिपसे, राजेंद्र विप्र, प्रज्ञा कांबळे, अंकुश एकबोटे, गणेश हुरसाळे, अनुराधा क्षिरसागर, बाळासाहेब रायकर, यशवंत जोशी, मंदार मते, शर्मिला श्रीरंग साठे, हेमंत गद्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : खेड शिवापूर टोल नाक्यावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई; ६५ लाखांचा गुटखा जप्त
Bhor News : करंदी तंटामुक्त अध्यक्षपदी विठ्ठल खाटपे यांची निवड
Bhor News : पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा