Bhor News भोर, (पुणे) : बैलाने केलेल्या कष्टाची परतफेड करण्यासाठी भोर तालुक्यातील एका शेतकऱ्याने बैलाचा चक्क तेरावा घातला आहे. या तेराव्याच्या कार्यक्रमाला भोर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलाचा गेली २० वर्ष स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ…!
भोर तालुक्यातील कान्हावडी गावचे शेतकरी गणेश मरगजे यांनी त्यांच्याकडे असलेल्या बैलाचा गेली २० वर्ष स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्या बैलाचे नाव कैलास असे होते. २००२ मध्ये त्यांनी हा बैल विकत घेतला होता. अगदी मुलाप्रमाणे हे शेतकरी त्याचा सांभाळ करत होते.
मानवी प्रथेप्रमाणे त्यांनी या बैलाचे सर्व विधी पार पाडले. मात्र, बैल वृद्ध झाल्याने त्याचा २८ फेब्रुवारी रोजीला कैलासचा मृत्यू झाला. त्या बैलाच्या उपकाराची परत फेड कशी करावी या उद्देशाने मरगजे यांनी त्या बैलाचा तेराव्याचा कार्यक्रम घालण्याचे ठरवले.
कैलास याचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर गणेश मरगजे यांना धक्का बसला होता. मात्र, त्यातून सावरत शेतकऱ्याने त्याचे सर्व विधी मानवी परंपरेप्रमाणे केले. या दिवशी विधिवत पूजा करून संपूर्ण गावाला तेराव्याचं जेवण घालण्यात आलं. या तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील शेतकरी, नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होता.
दरम्यान, तेराव्याचा कार्यक्रम घालून शेतकरी आणि बैलाचं नात हे अतूट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घटनेने त्यांची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे. त्यामुळे सध्या शेतकरी आणि त्यांच्या बैलाच्या घातलेल्या तेराव्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. अनेकजण शेतकऱ्याचे कौतुक करत असल्याचे पहायला मिळत आहे. महिलांनी देखील त्यांची विधिवत पूजा करत त्याच्या आत्म्याला शांती मिळण्याची प्रार्थना केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :