जीवन सोनवणे
Bhor News : भोर/हवेली : खेड शिवापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या वाहनावर महामार्ग पोलिसांनी कारवाई करत, पान मसाला जप्त केला. याप्रकरणी गुटखा वाहतूक करणारे चालक इम्रान खान (वय ४१, उत्तर प्रदेश, सध्या रा. वसई) यांना पकडण्यात आले असून, अंदाजे ६५ लाख रुपये किमतीचा पान मसाला जप्त करण्यात आला.
महामार्ग पोलिसांची कारवाई
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज (ता. ११) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर गावच्या हद्दीतून, सातारा-पुणे महामार्गावरून पान मसाला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती गुप्त बातमीदारामार्फत महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार महामार्ग पोलिसांनी टोल नाक्यावर सापळा रचून वाहन पकडले. (Bhor News) वाहनचालक इम्रान खान याच्याकडून टाटा टेम्पो (क्र. एम. एच. ३, सी.ची. ३०१७) व अंदाजे ६५ लाख रुपये किमतीचा पान मसाला जप्त करण्यात आला.
या वेळी कारवाई करतेवेळी विमल कंपनीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू तसेच सोबत इलायची माल मिळून आला. त्यानुसार संशयित आरोपी असलेला चालक व पकडण्यात आलेले वाहन राजगड पोलिसांच्या ताब्यात देऊन, कारवाईचे काम राजगड पोलिसांकडून करण्यात आले. (Bhor News) हा पान मसाला आरोग्यास हानीकारक आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. त्याविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमाचे २०११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस आयुक्त टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खतीप, पोलीस उपनिरीक्षक कापसे, साखरे, पोलीस हवालदार गोडसे, सय्यद, भुजबळ, पड्याळ, जाधव सपकाळ, कामठे व चालक शिंगाडे यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : करंदी तंटामुक्त अध्यक्षपदी विठ्ठल खाटपे यांची निवड
Bhor News : पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा
Bhor News : नसरापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात