जीवन सोनवणे
Bhor News : भोर : मागील काही दिवसांपासून नसरापूर तालुका, भोर भागातून चोरीला गेलेल्या दुचाकी अखेर सापडल्या आहेत. या दुचाकी चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी मिळाल्या आहेत.
पाच दुचाकी जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेलाडी फाटा ब्रीज खालून काही दिवसांपासून दुचाकींची चोरी होत होती. त्या अनुशंगाने राजगड पोलीस तपास करत होते. ७ सप्टेंबरला पोलिस उपनिरीक्षक सुतनासे, सहाय्यक फौजदार ढावरे, पोलिस हवालदार कुदळे, पोलिस नाईक कोंढाळकर यांचे पथक नाकाबंदी करताना चेलाडी उड्डाण पुलाखाली एक अल्पवयीन मुलगा बजाज कंपनीची डिस्कव्हर चालवित येत असलेला दिसला. (Bhor News) त्यास थांबवून त्याच्याकडे असलेल्या डिस्कव्हरची (एमएच/१२/जीडी/१६८२) कागदपत्रे व लायसन्स मागितले. त्याने कागदपत्र व लायसन्स नसल्याबाबत सांगितले.
पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून घेऊन त्यांच्यासमक्ष अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या डिस्कवरच्या नंबरची खात्री केली असता हा नंबर होंडा डिओ स्कूटरचा असल्याचे दिसून आले. मोटार सायकल चोरीची असल्याच्या संशयावरुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सहा दुचाकी चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले. त्यातील चार दुचाकी वापरुन पेट्रोल संपल्यानंतर सोडून दिल्याचे सांगितले. (Bhor News) त्याच्याजवळ सापडलेल्या डिस्कव्हर बजाज (एमएच/१२/जीडी/१६८२) ही गाडी कोणाची आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले असून, त्याने चोरी केलेल्या दुचाकी मूळ मालकांना देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. (Bhor News) या अल्पवयीन चोरट्यास न्यायालयात हजर करण्याची पुढील कारवाई राजगड पोलीस करत आहेत.
ही कारवाई बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे, आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुतनासे, सहाय्यक फौजदार ढावरे, पोलिस हवालदार कुदळे, पोलिस नाईक कोंढाळकर यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार ढावरे हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवगंगा खोऱ्यात निषेध मोर्चा