जीवन सोनवणे
भोर, (पुणे) : गणपती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेऊन बुधवारी (ता. २०) सायंकाळी “पाई पेट्रोलिंग” केली आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र गणेश आगमन जल्लोष होत आहे. या पार्श्वभूमीवर खेड – शिवापुर भागात तसेच तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, नव प्रविष्ट महिला, पोलीस शिपाई यांनी सहभाग घेवून खेड शिवापूर सर्व भागातून बुधवारी पाई पेट्रोलिंग केले.
दरम्यान, खेड शिवापूर परिसरात राजगड पोलीस स्टेशन अंकित पोलीस चौकी तयार करण्यात आली. आज पर्यंत पोलीस चौकी झाल्यापासून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रथमच पाई पेट्रोलिंग घेण्यात आल्याने खेड शिवापुर परिसरातील नागरिकांकडून नूतन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे कौतुक केले जात आहे.
याबाबत बोलताना राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप म्हणाले, “गणेश उत्सवाच्या निमित्ताने भागामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या कारणासाठी येणाऱ्या काळात दररोज पाई पेट्रोलिंग केले जाणार. आपल्या परिसरात कोणता आणुचीत प्रकार घडू नये याची काळाची नागरिकांनी घ्यावी.”