पुणे : कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो या निर्माण क्षेत्रातील प्रदर्शनाच्या कामाचे भूमीपूजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल यांच्या शुभहस्ते गुरुवारी (ता.२२) करण्यात आले.
यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील वरिष्ठ अधिकारी वर्ग तसेच पुणे बांधकाम अभियांत्रिकी संशोधन प्रतिष्ठानचे पदाधिकारी व बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो या निर्माण क्षेत्रातील प्रदर्शनाचे आयोजन पुणे बांधकाम अभियांत्रिकी संशोधन प्रतिष्ठान (PCERF) व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ जानेवारी २०२३ या दरम्यान करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन मोशी येथील अद्ययावत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र येथे आयोजित केले जात आहे.
सदर प्रदर्शनात निर्माण क्षेत्रातील अत्याधुनिक वस्तू, उपकरणे, प्रणाली व तंत्रज्ञान यांची माहिती मिळेल. सदर प्रदर्शन हे निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.