राहुलकुमार अवचट
यवत : देऊळगाव गाडा गावठाण येथील गावठाण हद्दीतील सुमारे १५ लाख रुपये रकमेच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उपसरपंच प्रमिला वाघापुरे यांच्या हस्ते झाले. पुणे जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रमेश थोरात, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे यांच्या पाठपुराव्यातून व प्रयत्नांतून हे काम मंजूर झाले होते.
या कामासाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विशाल बारवकर, माजी उपसरपंच गणेश जाधव, माजी सरपंच वैशाली बारवकर, सदस्य अक्षय बारवकर, जेष्ठ नेते सदस्य भाऊसाहेब शितोळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
या वेळी देऊळगाव गाडाचे सरपंच व विद्यमान सदस्य विशाल बारवकर, उपसरपंच व विद्यमान सदस्य गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर, राजवर्धन जगताप, जेष्ठ नेते माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शितोळे, सोमनाथ बारवकर, माजी सदस्या द्रोपदा पवार, माजी सदस्य झुंबर मोरे, भगवान पवार, दादासाहेब मोरे, वाल्मिक काटे, प्रल्हाद पवार, माऊली वाघापुरे, अमोल पवार, किरण रासकर, गणेश काटे, अजित पवार, अली तांबोळी, कंत्राटदार भोंडवे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक काटे, सचिन मोरे यांच्यासह आजी-माजी सदस्य, ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.