भिगवण : येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण कामांमुळे, भिगवणच्या विकासाला चालना मिळून रस्त्यांचे जाळे निर्माण होण्यास मदत होत आहे.
मंगळवारी (दि.13) येथील वॉर्ड नं.1 मधील बिराज माने घर ते प्रसाद बोगावत घर रस्ता (रक्कम रु 5 लाख) आणि वॉर्ड नं.2 मधील मोतीकर यांचे घर ते शंकरराव गायकवाड घर रस्ता (रक्कम रु. 5 लाख) या कामांचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून भुमीपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन करण्याचा मान गाव पुढाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांना देण्यात आल्याने सरपंच प्रतिनिधी तुषार क्षीरसागर, उपसरपंच प्रतिनिधी जावेद शेख यांचे यावेळी ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी बिराज माने, प्रदीप बोगावत, आण्णासाहेब धवडे, संजय देहाडे, पराग जाधव, प्रा.तुषार क्षीरसागर, जावेद शेख, सचिन बोगावत, गुरप्पा पवार, आप्पासाहेब गायकवाड, प्रदिप वाकसे, योगेश चव्हाण, विशाल पाचांगणे, लहुजी घोलप, आकाश उंडाळे, प्रसाद बोगावत, अमोल शिंदे, पिंटू शेलार, गणेश कांबळे, निखिल बोगावत, किरण रायसोनी, खंडेराव नाझरकर, सत्यवान भोसले, शहाजी गाडे, अनिकेत भिसे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांच्या मदतीने भविष्यातही अशाच प्रकारच्या शाश्वत पायाभूत सुविधा व योजना राबविण्याचा मानस आहे. येणाऱ्या काळात गावातील उर्वरित रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन व व्यवस्थापन, लाईट अशा विविध प्रकारच्या विकास कामांकरीता निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
-दिपीका क्षीरसागर, सरपंच- भिगवण