अरुण भोई
Bhimanagar News : भीमानगर : उजनी धरण भीमानगर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिउत्साहात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भोई बांधव व नदीकिनारी रहाणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ नदीची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. पाहूया नारळी पौर्णिमा कशी साजरे करतात
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
भोई बांधव नारळ पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी नदीत लोटतात.भोई वाड्यातून मिरवणुका निघतात. थोरामोठ्यांपासून लहान मुलांसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने नदी किनाऱ्यावर येतात.आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात. नदी शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ, म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ नदीत विधिवत सोडला जातो. (Bhimanagar News ) नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा(पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला व नदीला दाखवतात. नदीची यथासांग पूजा करतात. नदीला मासेमारीला जाणाऱ्या आपल्या धन्याचे रक्षण व्हावे आणि बोटीवर मुबलक मासोळी मिळावी यासाठी भोई भगिनी समुद्राला गाऱ्हाणे घालतात.त्यामध्ये युकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला पाहायला मिळाला आहे. (Bhimanagar News ) प्रमुख उपस्थिती म्हाडा मतदार संघाचे आमदार बबन दादा शिंदे, मा. सभापती संजय पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष नंदकुमार नगरे, उपाध्यक्ष सीताराम नगरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू सल्ले, पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ नगरे, सोलापुर जिल्हा अध्यक्ष नितीन इरीचे, राज्य सदस्य विजय नगरे, संघटक हनुमंत नगरे, माऊली नगरे, कांतीलाल नगरे, पप्पू भैया मित्र मंडळ यांच्यासह सर्व मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : शेतकऱ्याला ४ कोटींचे आमिष दाखवून, सव्वा कोटींना लुबाडले
Indapur News : स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Indapur News : दुर्दैवी घटना..! इंदापूर तालुक्यातील लाकडीत माय-लेकीचा विहिरीमध्ये पडून मृत्यू..