Bhima koregaon verdict : नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचारप्ररणी अटकेत असलेल्या आरोपी ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांनी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप आहेत. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने ३ मार्च रोजी निकाल राखून ठेवल्यानंतर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेल्या ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस हे भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी २०१८ पासून तुरुंगात आहेत. (Bhima koregaon verdict) यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावेळी अशाच प्रकरणात सहआरोपी असलेल्या सुधा भारद्धाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा युक्तीवाद या दोघांनी कोर्टात केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व न्यायमूर्ती सुधांशू धूलिया यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने व्हर्नन गोन्साल्विस व अरुण फरेरा यांना जामीन मंजूर केला. (Bhima koregaon verdict) आरोपी मागील ५ वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहेत. भलेही त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. पण तुरुंगात एवढा मोठा काळ काढल्यामुळे ते जामीनाचे हकदार आहेत, असे न्यायालयाने या प्रकरणी स्पष्ट केले.
जामीन देताना कठोर अटी लादल्या
न्यायालयाने उभय आरोपींना जामीन मंजूर करताना कठोर अटीही लादल्या आहेत. त्यानुसार, गोन्साल्विस व फरेरा यांना एकच मोबाइल वापरता येईल. त्याचे लोकेशन तपास अधिकाऱ्यांसाठी २४ बाय ७ उपलब्ध राहील. (Bhima koregaon verdict) याशिवाय त्यांना विशेष एनआयए न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी असणार नाही. याशिवाय न्यायालयाने गोन्साल्विस व फरेरा यांना आपले पासपोर्ट पोलिसांकडे सुपूर्द करण्याचेही निर्देश दिलेत.
भीमा कोरेगाव दंगलीच्या सहा महिन्यानंतर २०१८ च्या ऑक्टोबर महिन्यात ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना बेकादेशीर कृती कायदा (UAPA)अंतर्गत अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यावर मोओवाद्याशी संबंध असल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. (Bhima koregaon verdict) यावेळी यांच्यासह सुधा भारद्वाज, पी वारा राव आणि गौतम नवलखा या इतर कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली होती. सुरुवातीला या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नजरकैदैत ठेवण्यात आले होते.
हे प्रकरण ३१ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेशी संबंधित आहे. या परिषदेला माओवाद्यांनी पत पुरवठा केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे. (Bhima koregaon verdict) या परिषदेतील प्रक्षोभक भाषणांतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील कोरेगाव भीमा येथील युद्ध स्मारक परिसरात हिंसाचार झाल्याचा आरोप आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश
Koregaon Bhima | अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी…