भिगवण (प्रतिनिधी)
Bhigwan : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 येथे सुरू होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेस मोठा प्रतिसाद मिळाला असून या भरतीसाठी एकूण 24 हजार 436 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 104 पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांनी दिली.

सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून ती पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होऊन सकाळी 9 वाजेपर्यंत चालणार आहे. दररोज सुमारे 1200 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात येत असून ही प्रक्रिया 16 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी RFID प्रणालीचा वापर करण्यात येत असून संपूर्ण प्रक्रियेवर काटेकोर देखरेख ठेवण्यात आली आहे. तसेच भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, अल्पोपहार तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता व गैरवर्तन न करता प्रामाणिकपणे भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांनी केले.







