सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राअंतर्गत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांतून भिगवणसाठी लाखो रुपयांचा निधी मिळाला आहे; परंतु संबंधित कामे ऑनलाईन ओपन टेंडर पद्धतीने करावीत, की ई-कोटेशन टेंडर पद्धतीने करावीत, या वादामुळे कामे रखडली होती. अखेर यातील काही कामे ऑनलाईन ओपन टेंडर पद्धतीने केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होताना दिसत आहे.
भिगवण येथील वॉर्ड क्र. १ मधील राजू मोतीकर घर ते अण्णा भाऊ साठे समाज मंदिर ते दत्तू साठे घर रस्ता या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९ लाख ९९हजार ८७२ रुपये असून, हे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा १६ टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. या कामामध्ये १ लाख ५९ हजार ९८० रुपये बचत झाली आहे. तसेच वॉर्ड क्रं २ मधील भिगवण स्मशानभूमी ते आर्या पाईप रस्ता या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९ लाख ९९ हजार ८७२ रुपये असून, हे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा २२ टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. या कामामध्ये २ लाख १९ हजार ९७२ रुपयांची बचत झाली आहे. (Bhigwan News) आदर्श विद्या मंदिर ते राशीन या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९ लाख ९९ हजार ८७२ रुपये असून, हे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा २२.०४ टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. या कामामध्ये २ लाख २० हजार ३७२ रुपयांची बचत झालेली आहे. वॉर्ड क्र. ३ मधील अमोल पाटील घर ते सर्व्हिस रस्ता या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९ लाख ९९ हजार ८७२ रुपये असून, हे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा २३.०४ टक्के कमी दराने मंजूर झाले असून, या कामात २ लाख ३० हजार ३७१ रुपयांची बचत होऊन, आर्थिक फायदा झाला आहे.
विकासकामांमध्ये एकूण ८ लाख ३० हजार ६९५ रुपयांची बचत
वरील चारही ऑनलाईन निविदांमधील विकासकामांमध्ये एकूण ८ लाख ३० हजार ६९५ रुपयांची बचत होऊन, आर्थिक फायदा झालेला आहे. महत्वाचे म्हणजे यापूर्वीही ३ लाख १८ हजारांहून अधिक बचत झालेली असून, गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ११ लाख ४८ हजार रुपयांपेक्षा जास्त बचत होऊन गावाचा आर्थिक फायदा झाला आहे. (Bhigwan News) यामुळे भविष्यात देखील विकासकामे करीत असताना ऑनलाइन टेंडर पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
यापूर्वी ऑनलाईन निविदा पद्धतीची माहिती ग्रामस्थांना नव्हती. तसेच अशा पद्धतीने गावात कामे झाल्याचेही ऐकीवात नव्हते. (Bhigwan News) ही पद्धती ग्रामस्थांना आणि सत्ता भोगलेल्यांना माहीत होती का नव्हती, हे मात्र गुलदस्त्यात आहे. यापूर्वी किती कामे ऑनलाईन ओपन टेंडर पद्धतीने केली आहेत, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : …अखेर कर्मयोगी कारखान्याची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.
Bhigwan News : चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचताच दत्तकला शिक्षण संस्थेत एकच जल्लोष