सागर जगदाळे
भिगवण : पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडू यांना सुमारे २५ हजार रुपये रकमेची रोख बक्षीसे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
विद्यालयात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभातफेरी, सामुदायिक कवायत, स्काऊट गाईड संचलन करण्यात आले. या वेळी विद्यालयातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे प्रथम तीन क्रमांक (Bhigwan News ) तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी सिद्धी बनसुडे, प्रिया शिरसट, संज्योत सपकळ तसेच बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीनी तनुश्री मत्रे, मृणाल काळे, प्रतिक्षा देवकाते, जयश्री जगताप, साक्षी राजमाने, समय दोशी, विश्वतेज देवकर, आदित्य कदम, सोहम राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसे देण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेला विद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिजित ढेरे यांचाही सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेतील प्राविण्य मिळवणारा खेळाडू प्रज्योत काळे, उदयसिंह काळे, शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थीनी वैष्णवी गायकवाड, वैष्णवी सपकळ यांचाही सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रकाशभाऊ काळे यांच्या स्मरणार्थ विद्यमान अध्यक्ष भूषण काळे, (Bhigwan News ) राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, केशर मल्हार शिष्यवृत्ती, मातोश्री शिष्यवृत्ती, पंडित पोतदार फाउंडेशन, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब गांधले, विजयकुमार काळे, प्रकाश भोसले, अमिन मुल्ला, हिराजी काळे आदी बक्षीस दात्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, २५ हजार रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीस, शालोपयोगी साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा प्राचार्य बाळू काळे यांनी घेतला. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, खजिनदार बबन काळे, संचालक बाळासाहेब नायकवाडी, पळसदेवचे सरपंच, ग्रामसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, विद्यालयाचे माजी सेवक, प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, (Bhigwan News ) संजय जाधव, तानाजी इरकल, अशोक जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. आभार अविनाश शेलार यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : ..अखेर विहीर मालक व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ; विहीर मालकाला अटक