सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : भिगवणमध्ये आयशर आणि स्कॉर्पिओ कार यांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर नऊ जण जखमी झाले. हा अपघात सकाळी साडेसहाच्या सुमारास झाला.
आयशर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
भिगवण येथील हॉटेल ज्योती मिसळच्यासमोर बंद अवस्थेत असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून स्कॉर्पिओ गाडीची जोरदार धडक बसली. यामध्ये स्कॉर्पिओ गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ गाडीतील राजू गोविंद फडके यांनी फिर्याद दिली असून, आयशर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या अपघाताबाबत भिगवण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आज गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास भिगवण (ता. इंदाप) गावच्या हद्दीत पुणे-सोलापुर हायवे रोडवर हॉटेल ज्योतीसमोर आयशर गाडी (एमएच. 43. यु 6817) चा चालक महेश हनुमंत गिरी (वय 32 वर्षे, रा. धनगरवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे) याने टेम्पो हा बंद पडलेला (Bhigwan News) असताना वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून टेम्पो पुणे- सोलापूर महामार्गावर रस्त्यामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभा केला होता. टेम्पो बंद पडलेला आहे हे माहीत असतानाही त्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे लक्षात यावे म्हणून कोणत्याही प्रकारचे रिप्लेक्टर किंवा इंडीकेटर न लावता महामार्गाच्या कडेला उभा केला होता.
तसेच गाडीपासून थोड्या अंतरावरही कोणत्याही प्रकारे फलक लावले नाही. (Bhigwan News) त्यामुळे स्कापिओ (एम.एच. 14. जी.ए. 5514) वरील चालक पांडुरंग लक्ष्मण मुरकुटे यास त्याचा अंदाज न आल्याने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकून अपघात झाला.
या अपघातात चालक व गाडीतील फिर्यादी तसेच त्यांची पत्नी वैषाली राजु फडके (रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) फिर्यादीचे मेव्हणे मच्छिंद्र बाळासाहेब विस्कर, सासु लक्ष्मीबाई बाळासाहेब विल्कर तसेच प्रितम जालिंदर विरकर, स्वरा जालिंदर विरकर (रा. चिखली, ता. हवेली, जि. पुणे), मंगल राहुल मेदनकर, (Bhigwan News) विशाल विलास मोरे (रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि.पुणे), संगिता विलास मोरे (रा. चिखली, ता. हवेली, जि. पुणे) हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. तर त्यांचा मेहुणा जालिंदर बाळासाहेब विरकर (वय 36 वर्षे, रा. चिखली, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या डोक्याला, डाव्या हाताल आणि छातीला गंभीर जखमा झाल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई; नागरिक नाराज!
Bhigwan News : भिगवण परिसरात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह