सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : तक्रारवाडीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक उपक्रमामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रतिमेचे पूजन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली.
मुक्ताई ब्लड बँकेचे शिबिरासाठी सहकार्य
रक्तदान शिबिराचे उद्घाटन तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ व भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते पार पडले. (Bhigwan News) रक्तसंकलन करण्यासाठी मुक्ताई ब्लड बँकेच्या वतीने सहकार्य लाभले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या वतीने प्रमाणपत्र व आकर्षक गिफ्ट देण्यात आले.
यावेळी तक्रारवाडीच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ, उपसरपंच आशा जगताप सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (Bhigwan News) त्याचबरोबर महेश देवकाते, यशवंत वाघ, पराग जाधव, मारुती वनवे, अजिंक्य माडगे, प्रदीप वाकसे, सचिन बोगावत संजय देहाडे, अशोक शिंदे,सतीश वाघ प्रशांत वाघ,राजेंद्र वाघ, शरद चितारे अमितकुमार वाघ,शरद वाघ, राजू गाडे, सचिन वाघ, तुषार क्षिरसागर, रोहित भरने, राहुल गाडे आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी दीड कोटीचा निधी देणार; हर्षवर्धन पाटील यांचे आश्वासन