सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : जिल्हा परिषदेच्या माध्यामिक व प्राथमिक शिक्षण विभागाशी निगडित असलेल्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे सर्व सेवाविषयक प्रश्न लवकर सोडविणार आहे. असे आश्वासन उपशिक्षणाधिकारी संजयकुमार काळे यांनी दिले आहे.
पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी संजयकुमार काळे यांची नुकतीच भेट घेत घेतली. यावेळी समितीच्या वतीने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन दिले. त्यावेळी संजयकुमार काळे यांनी वरील आश्वासन दिले आहे. (Bhigwan News) यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी, जिल्हा सरचिटणीस संदिप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना काळे म्हणाले कि, पुणे जिल्ह्यातील सामान्य शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा अभ्यास करून सर्वसमावेशक प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. जिल्ह्यातील ४९२ शिक्षकांच्या वेतन त्रुटी संदर्भात राज्य शासनास तातडीने अहवाल तयार करून सादर करणार आहे. (Bhigwan News) असे आश्वासन काळे यांनी दिले आहे.
दरम्यान, जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी एका शाळेवर किमान एक वर्ष सेवेची अट नामांकन भरताना अडचणीची ठरत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. (Bhigwan News) या विषयावर शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्याशी संवाद साधून मार्ग काढणार आहे. असेही काळे यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी जुन्नर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश दुरगुडे , शिरूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक अविनाश चव्हाण, शिक्षक समितीचे जिल्हा चिटणीस सतीश बुळे , आंबेगाव तालुका शिक्षक समितीचे नेते उमेश उतळे आदी मान्यवर उपस्थित होते .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तक्रारवाडीत 41 बाटल्यांचे रक्तसंकलन
Bhigwan News : तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी दीड कोटीचा निधी देणार; हर्षवर्धन पाटील यांचे आश्वासन