Bhigwan News भिगवण : भिगवण रोटरी क्लबने राबविलेल्या ‘डेंटल हेल्थ चेकअप’ या शिबिराचा भिगवण (ता. इंदापूर) येथील भैरवनाथ विद्यालयातील तब्बल १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. (Bhigwan News)
भिगवण रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या दातांच्या समस्या व त्यावरील आधुनिक पद्धतीने कसे उपचार केले पाहिजेत. या उद्देशाने या शिबिराचे आजोजन करण्यात आले होते. या शिबिरात भैरवनाथ विद्यालयातील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे, उपाध्यक्ष अतुल वाघ, खजिनदार कुलदीपक ननवरे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तपासणी भिगवण येथील प्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉ. पांडुरंग जिरगे. डॉ अभिजीत आटोळे, डॉ प्रशांत हगारे,डॉ शिवरानी खानावरे,डॉ धैर्यशील हिंगमिरे,डॉ चित्रा खर्से,डॉ अभिजित देवकाते यांनी केली.
यावेळी रियाज शेख, संपत बंडगर, डॉ. अमोल खानावरे, संजय रायसोनी, संतोष सवाणे व भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे यांनी केले. तर भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.