सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : बारामती-भिगवण रस्त्यावरील शेटफळगडेनजीक (ता. इंदापूर) दुचाकीवरून घरी निघालेल्या प्रवाशाचा पाठलाग करून, त्याच्या गळ्याला चाकू लावून, त्याच्याकडून तब्बल ८२ हजार रुपये रोख रक्कम दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. भर दिवसा घडलेल्या या अनपेक्षित घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. २८) दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लामजेवाडी येथील रहिवासी संतोष बाळासाहेब निगडे (वय ३१) हे त्यांच्या मोटारसायकलवरून (क्र. MH ४२ AM ९८२६) सोमवारी भिगवण येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून ८२ हजार रुपये रोख रक्कम आपल्या खात्यातून काढून, भिगवण-बारामती मार्गे लामजेवाडीकडे निघाले होते.
दुपारी साडेअकराच्या सुमारास ते शेटफळगडेनजीक बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता, (Bhigwan News) पाठीमागून होंडा कंपनीच्या पॅशन मोटारसायकलवरून (नंबर नसलेली) अंदाजे २५ ते ३० वर्षे वय असलेल्या दोन अज्ञात तरुणांनी निगडे यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावली. या अज्ञात तरुणांपैकी एकाने दुचाकीवरून उतरून निगडे यांच्या गळ्याला चाकू लावला व बळजबरीने बँकेतून काढलेले पैसे खिशातून काढून घेतले व तेथून पसार झाले.
शेटफळगडे गावात घडलेली चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मागच्या वर्षीपासून शेटफळगडे गावात चोरीचे सत्र सुरू आहे. याबाबत भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी शेटफळगडे ग्रामपंचायतीला सीसीटीव्ही बसवण्याबाबत चार वेळा निवेदन दिले आहे. परंतु ग्रामपंचायतीने अद्याप एकही कॅमेरा बसवलेला नाही. (Bhigwan News) त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. कॅमेरे असते तर चोर सापडले असते. गेल्या चार वर्षांत चार सरपंच बदलले; परंतु कॅमेरे बसविण्याची तजवीज कोणाला करता आली नाही, याची शेटफळगडे ग्रामस्थांना खंत वाटत आहे, असे मत ग्रामस्थ कुणाल कदम यांनी व्यक्त केले.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात संतोष निगडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खाडे करीत आहेत.
याबाबत बोलताना शेटफळगडे येथील सरपंच राहुल वाबळे म्हणाले, “सीसीटीव्ही बसवण्यासाठी ग्रामपंचायत शेटफळगडे गांभीर्याने विचार करत असून येत्या आठवड्यात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण केले जाईल.”
सरपंच
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचताच दत्तकला शिक्षण संस्थेत एकच जल्लोष
Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात शालेय साहित्य, खाऊचे वाटप
Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा सत्कार