-सागर जगदाळे
भिगवण : शासनाकडून अद्यापही अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश प्राप्त झालेले नाहीत याची दखल घेत भिगवणच्या सरपंच दिपीका तुषार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवत त्यांचा आनंद द्विगुणित केला. सरपंचांना शासनाकडून मिळणाऱ्या वेतनातून त्यांनी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश खरेदी करून मोफत वाटप केले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अशोक शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत गणवेश वाटपाबद्दल आभार व्यक्त केले. क्षीरसागर या स्वखर्चातून गणवेश वाटप करणाऱ्या पहिल्याच सरपंच ठरल्या आहेत हे विशेष.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच सत्यवान भोसले, संजय रायसोनी, जावेद शेख, प्रा.तुषार क्षीरसागर, प्रसाद क्षीरसागर, आप्पासाहेब गायकवाड, मनोज राक्षे, योगेश चव्हाण, केशव भापकर, अमर धवडे, ऍड.सुरज खटके, पिंटू शेलार, कपिल लांडगे, कृष्णा भिसे, अक्षय बनसोडे, राजू गाडे, नवनाथ धवडे, ज्ञानदेव भिसे, गणेश कांबळे, पप्पू चोपडे, प्रतिमा देहाडे, रत्नमाला रायसोनी, रेखा कांबळे, भारती शिंदे, ज्ञानदेव भोसले, मंगेश शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक असून गणवेश ही एक मूलभूत गरज आहे. मिळणाऱ्या वेतनातून विद्यार्थ्यांसाठी गणवेश देऊन मदतीचा हात देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.
-दिपीका क्षीरसागर, सरपंच- भिगवण