सागर जगदाळे
Bhigvan News भिगवण, (पुणे) : तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांबरोबरच ग्रामस्थांच्या मदतीने व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारवाडी गावामध्ये विकासाचे नवीन पूर्व सुरू होणार असून, गावाचा विकास एका उंच शिखरावरती नेऊन ठेवण्याचे काम यापुढील काळात करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांनी केले आहे. (Bhigvan News)
तक्रारवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरपंच मनीषा वाघ यांची बुधवारी (ता. ३१) निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक कोकरे यांनी दिली. सरपंचपदी निवड होताच मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वाघ बोलत होत्या.
मागील दोन महिन्यांपासून तक्रारवाडी गावचे रिक्त असलेले सरपंच पद इंदापूर तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला होता. माजी सरपंच सतीश विनायक वाघ यांची तक्रारवाडी गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा सरपंच म्हणून निवड झाली होती. आपला अडीच वर्षाचा सरपंच पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता.
राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायतही हातून निसटली आहे. सरपंच सतीश वाघ यांच्या राजीनाम्यानंतर जे नाट्य घडले आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच तक्रारवाडी ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला हा घास राष्ट्रवादीच्या सदस्यांना नीट खाता आला नाही व त्याचाच परिणामी म्हणजे ग्रामपंचायत हातातून निसटली व ती भाजपच्या ताब्यामध्ये अलगत जाऊन बसली आहे. यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण हा प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित राहिलेला आहे.
सरपंच पदासाठी खुल्या प्रवर्गातून राणी नितीन काळंगे आणी मनीषा प्रशांत वाघ यांनी आपले अर्ज दाखल केले होते. राणी काळंगे यांना ४ तर मनीषा वाघ यांना ५ मते पडली. सरपंच पदाच्या लालसेपोटी हा पराभव ओढावून घेतला काय अशी दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीपूर्वी पक्षीय बलाबल हे राष्ट्रवादीचे सदस्य जास्त असूनही आपली वज्रमूठ त्यांना नीट आवळता आली नाही. त्याचा परिणाम हा सरपंच पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव आहे.
सर्वपक्षीय म्हणून निवडून आलेल्या ७ पैकी ५ सदस्यांनी गत काळात निवडणूक होताच पदासाठी गाव सोडून वेगळा विचार सामोरा आणला होता. त्याच विचारांचा वारसा जपत यावेळी विरोधी गटाचे सदस्य गाव सोडून परगावी गेले होते. ते आज निवडणुकीसाठी गावात हजर झाल्याचे पाहावयास मिळाले. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच पदासाठीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला व हा बंदोबस्त निवडणूक झाल्यानंतर ही सायंकाळ पर्यंत गावात तसाच होता.
दरम्यान, या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी दीपक कोकरे, ग्रामसेवक दीपक बोरावके, तलाठी महादेव भारती यांच्यासह पोलीस पाटील अमर धुमाळ,ज्ञसहायक मिथुन शेलार यांनी कामकाज पाहिले. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी यावेळी निवडणूक वेळी गावांत चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.