सागर जगदाळे
(Bhigvan News) भिगवण : हिंदू-मुस्लीम या दोन्ही धर्माच्या नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी गावात ‘पिरसाहेब राज बाग सवॉर’ ऊरुसाला उद्यापासून (सोमवार) मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.
यात्रेला राज्यातून अनेक भाविक दर्शनाला येत असतात. पिरसाहेब यांच्या दर्शनाला सर्व जाती-धर्माचे भक्त मोठ्या भक्तीने येत असल्याने चांगलीच गर्दी होत असते. या यात्रेमध्ये हिंदू-मुस्लीम बांधवाचे ऐक्य पाहायला मिळते.
पारंपरिक पध्दतीने वाद्याच्या गजरात ‘संदल’ची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर फुलांची चादर तसेच मलिदाचा नैवद्य दिला जातो. ग्रामपंचायतीने तसेच यात्रा कमिटीने ऊरुसानिमित्त धार्मिक, प्रबोधन कार्यक्रम व कुस्त्याच्या आखाड्याचे नियोजन करून जय्यत तयारी केली आहे.
पिरसाहेब महाराज यात्रेनिमित्त सोमवारी (ता.१३) सायंकाळी ७वा महाप्रसाद व त्यानंतर गावातून संदल निघणार आहे. मंगळवारी (ता १४ )रोजी रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत छबीन्याची (मिरवणूक) ग्रामप्रदिक्षणा निघेल. रात्री ११ वा वसंत नांदवळकरसह रवींद्र पिंपळे यांचा लोकनाट्य तमाशा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. बुधवारी( ता.१५ ) रोजी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होऊन सायंकाळी ४ वा जंगी कुस्त्यांचा आखाडा होईल.रात्री खास महिलांसाठी स्वरसंगम आर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तक्रारवाडी ऊरुसामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भिगवण पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
भिगवण येथील विद्या प्रतिष्ठान बिल्ट प्रांगणात रंगली सुगरणींमध्ये चुरशीची स्पर्धा
Hinjwadi Crime News : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पतीने केली पत्नीची हत्या