पुणे : हवामान खात्याने दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड मधील पहिली ते दहावीच्या शाळांना उद्या १५ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान पुण्यातील मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने डेक्कन कॅम्पसच्या बाजूला असलेला भिडे पूल काल मंगळवारी रात्री पाण्यात बुडाला. त्यामुळे रात्रीपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला आहे.
शहर आणि खडकवासला धरण साखळी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मंगळवारपासून मुठा नदीतील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री दहा वाजता डेक्कन बाजूचा पूल भिडे पाण्यात बुडाला. त्यामुळे डेक्कन वाहतूक विभागाने मंगळवारी रात्रीपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून डेक्कन बसस्थानक ते भिडे पुल आणि नारायण पेठ ते डेक्कनपर्यंतचा रस्ता तात्पुरता बंद केला आहे.
\डेक्कनच्या वाहतूक विभागाने डेक्कनमधील खंडोजी बाबा चौकाचा शहराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा आणि त्याच पुलाचा वापर कर्वे रोड किंवा लालबहा