विशाल कदम
Bhavrapur Crime | लोणी काळभोर : भवरापूर (ता. हवेली) येथील अवैध हातभट्टी दारु तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड टाकून लोणी काळभोर पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर या छाप्यात पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे तब्बल २२ हजार रुपयांचे रसायन नष्ट केले आहे.
अरविंद रामलाल राजपुत (वय ५४ , रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवरापूर ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकरवस्ती जवळ असलेल्या ओढ्यालगतच्या आडोशाला अवैध गावठी हातभट्टी दारु बनविली जात आहे. अशी माहिती पोलीस कर्मचारी देवीकर यांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकून अरविंद राजपुत याला ताब्यात घेतले.
२२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट…
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत २ हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन आणि दारू बनविण्याचे साहित्य असा सुमारे २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गायकवाड, नागलोत, देवीकर, शिरगीरे, कुदळे आणि पवार यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Loni Kand Crime : भाडेतत्वावर कार घेऊन अपहार करणार्या आरोपीच्या लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या