बापू मुळीक / सासवड : पुरंदर -हवेली मतदारसंघांमध्ये महायुतीचे दोन उमेदवार असल्यामुळे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, संभ्रमावस्थेत होते. भाजच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षाचे निरीक्षक संजय मौस्कीनी यांनी धुमेवाडी येथे मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पक्षाने पुरंदर -हवेली मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.
तसेच सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून विजय शिवतारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सदर बैठकीस जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, अशोक टेकवडे, शेखर वढणे, निलेश जगताप, संदीप हरपळे, संतोष जगताप, साकेत जगताप, पंडित मोडक, गणेश भोसले व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.