बापू मुळीक
सासवड: सासवड नगर परिषदेने पुणे-पंढरपूर हायवे रस्त्यावरील दुभाजकांमधील कुंड्यांमध्ये युपोरबिया मिली या जातीचे फुल झाडे लावले आहेत. यामुळे रस्त्याच्या सुशोभीकरनात वाढ झाली आहे.
या झाडावर वर्षभर फुले येत असतात, हे झाड पेस्ट कंट्रोल म्हणून काम करते. युपोरबिया मिली ही कमी पाण्यावर येणारी आणि कमी वाढ होणारी वनस्पती आहे. या वनस्पतीची वारंवार कटिंग करावी लागत नाही. तसेच जास्त दिवस टिकणारे, फांद्या कमी असणारे, जास्त जाग्यावर न पसरणारे असे ह्या झाडाचे वैशिष्ट्य आहे. असे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले.
यापूर्वी सासवड नगर परिषदेने कुंड्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे फुलांची झाडे लावले होते. परंतु पोषक वातावरण नसल्याने, झाडे नष्ट होणे, कोमजणे, जास्त दिवस न टिकणे, अश्या समस्या उद्भवयाच्या त्यामुळे वनस्पती तज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन सदरची लागवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे सासवडच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे, असे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले.