पुणे : पुण्यातील संगमवाडी परिसरात दोन जणांनी एका व्यक्तीला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही लघवी करण्याची जागा आहे का अशी विचारणा केल्याच्या रागातून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संगमवाडी येथील लग्झरी पार्कींग क्रमांक तीन जवळ घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रुपेश शंकर खांडरे (वय-45 रा. राम मंदिराजवळ, संगमवाडी, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राहूल रसाळ (वय-30 रा. संगमवाडी, पुणे), बंट्या (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रुपेश खांडरे हे लोकांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी दारु पिऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या पाठीमागे लघुशंका करु लागल्याने फिर्यादी यांनी ही काय लघवी करण्याची जागा आहे का? असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने ढकलून दिले.
यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या लोखंडी रॉड आणि दगडाने डोळ्यावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच तु जर पोलिसांकडे तक्रार केली तर मी तुझ्या घरी येवून तुझे हात-पाय तोडेन अशी धमकी दिली. अस्ब्ताक्ररिता म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.