पुणे : पुणे जिल्ह्यात क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण मोहिम सुरू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. सचिन देसाई आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विकास वडगाये यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये काही ठरावीक ग्रामीण जिल्ह्यामध्ये व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रौढांना बीसीजी लस सप्टेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात बीसीजी लस देण्यासाठी आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विकास वडगाये यांनी केले आहे.