दीपक खिलारे
Basaveshwar Jayanti | इंदापूर : शहर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिरात बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी दहा वाजता माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर सायंकाळी पाच वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहराच्या मध्यवर्ती भागातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत समाजातील सर्व बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
मिरवणुकीत महिलांनी फुगडी, गरबा, फेर सादर केला. मिरवणुकीची सांगता सिद्धेश्वर मंदिरात झाली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रमोद भंडारी यांनी गुरुवंदना सादर केली. प्राध्यापक सदाशिव उंबरदंड यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विषयी माहिती सांगितली.
तदनंतर वीरशैव महिला भगिनी इंदापूर यांनी बसवेश्वर जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 21 रोजी महिलांसाठी घेतलेल्या पाककला, प्रश्नमंजुषा व संगीत खुर्ची तसेच मुलांसाठी घेतलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धामधील विजेत्यांना समाजातील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेचे नियोजन मंगल ढोले व स्वाती भंडारी यांनी केले. वरील सर्व कार्यक्रमासाठी समाजातील सर्व स्तरातून मोठ्या संख्येने वीरशैव बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राचलिंग स्वामी, महेश भिंगे,निलाखे सर, सुनील भंडारी व आनंद भंडारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
* स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे –
महिलांसाठी पाककला स्पर्धा प्रथम क्रमांक-सुनंदा भंडारी, द्वितीय क्रमांक-स्वाती ढोले, तृतीय क्रमांक – स्वप्नाली भंडारी, उत्तेजनार्थ बक्षीस – माधवी खरवडे .
• संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम क्रमांक- दिपाली उंबरदंड,द्वितीय क्रमांक- सुजाता बडदाळे.प्रश्न मंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक-राजश्री उंबरदंड.द्वितीय क्रमांक-प्राची चनशेट्टी.
• मुले फॅन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्रमांक – रुद्र ढोले. द्वितीय क्रमांक – अवनी भंडारी, तृतीय क्रमांक – मानसी खरवडे.