बारामती : पुण्यात चौघांनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेल्या प्रकरणात संबंधित पीडित मुलींवर बारामतीमधीलच आणखी सात जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही पिडीत मुलींनी तपासामध्ये आणखी सात जणांची नावे घेतले आहेत. त्यानुसार या प्रकरणात संबंधित सातही जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या अकरावर पोहचली आहे.
पोलिसांनी नवीन पुरवणीमध्ये ओंकार भारती, ओम कांबळे, अप्पा शेंडे, अक्षय मडके, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणिक भंडारी (संपूर्ण नावे नाहीत) या सात जणांवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सातही जणांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भारत आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे या चौघांवर यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी पीडित मुलींकडे सखोल चौकशी केल्यानंतर आणखी काही जणांनी या मुलींवर या अगोदरच्या काळात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या मुलींने दिलेल्या जबाबानंतर वरील सात जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.