Baramati News ; बारामती, (पुणे) : शहरी भागात अनेक जण विविध प्रकारचे छंद जोपासताना आपणाला पाहायला व ऐकायला मिळते. मात्र बारामती येथील एका व्यापाऱ्यांने चक्क आंध्र प्रदेश येथील पुंगनुर जातीची गायींचे शहरातील घरामध्येच संगोपन सुरू केले आहे. या गाईचे दूध, शेण, गोमूत्र अतिशय आयुर्वेदीय असते. आणि तिरुपती बालाजी येथे देखील या गाईचा दुधाचा अभिषेक केला जातो. या गाईंची चर्चा सद्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
माणिक खत्री असे या अवलियाचे नाव असून, ते बारामती शहरातील मुख्य बाजारपेठत वास्तव्यास आहेत. गाय सांभाळली पाहिजे असं पूर्वी सांगितलं जायचं…गावी असताना आम्ही पूर्वी गाई सांभाळायचं….मात्र कालांतराने लोक गाई सांभाळणे कमी करू लागले. (Baramati News) गावातून आता आम्ही गेली अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहोत.. गाई पाळण्याची आवड असल्याने आंध्र प्रदेश येथून पुंगनुर जातीच्या गाई आणल्या आहेत.
या गाया अतिशय शांत असतात आणि याची उंची देखील कमी असते. या गाईंचा कुठलाही त्रास नसतो. अगोदरच्या काळात गावात खेडोपाड्यात गाईंचा व्यवसाय चालायचा. (Baramati News) मात्र आता शहरी भागातही या गाईंचा व्यवसाय सुरू होत आहे. मला याची आवड असल्याने मी या पुंगनुर जातीच्या गाई पाळल्या आहेत. यांचे पालन पोषण करणे देखील सोपे असून उंची कमी असल्याने त्यांचा कुठलाही त्रास नसतो. घरातले कुटुंबीय देखील मला या कामात मदत करतात. अशी माहिती खत्री यांनी दिली.
काय असतात फायदे…
पुंगनुर गाईंच्या शेणाचा व गोमूत्राचा तसेच दुधाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. तसेच या गायीच्या शेणापासून गौरी बनवल्या जातात त्या शुद्ध शेणाच्याच असतात. त्यात काही मिसळलेले नसते. (Baramati News) अनेक जण या गौरी धूप लावण्यासाठी घेऊन जातात. यात आणखी महत्वाचं म्हणजे या गाईंच्या शेणाला आणि गोमुत्राला कुठलाही दुर्गंध आणि वास नसतो. त्यामुळे याचे अनेक फायदे असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : अंगावर डिझेल ओतून पत्नीला पेटवून हत्या केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा