Baramati News : बारामती, (पुणे) : नवीन जर्नल घेण्यासाठी पैसे भरून जर्नल दिले नाही, या शिवाय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची ग्वाही देऊन वेळोवेळी पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी बिहारमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Baramati News
मिनी कुमारी रविशंकर सिंग व चेतन पल्लव (दोघे रा. मुंगेरी गंज, बेगुसराई, बिहार) असे फसवणूक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मूळचे बारामतीत राहणारे परंतु सध्या दक्षिण कोरियात असणाऱ्या अमोल श्रीकृष्ण साळुंखे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटेनेने बारामतीत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी साळुंखे यांना युरेशियन केमिकल कम्युनिकेशन जर्नल, सॉलिड टेस्ट फीना फिनालेना जर्नल, जर्नल व वर्ड अकॅडमी सायन्स जर्नलमध्ये तुमचे शोधनिबंध प्रसिद्ध होतील असा विश्वास दिला. त्यापोटी फिर्यादीने त्यांना बारामतीतील त्यांच्या दोन बॅंकेतील खात्यांवरून २० लाख ५ हजारांची रक्कम पाठवली.
दरम्यान, परंतु कोणत्याही जर्नलमध्ये त्यांना प्रसिद्धी दिली गेली नाही. त्यांचा विश्वासघात करून संगनमताने फसवणूक केली गेली. त्यामुळे पैसे देताना किंवा ऑनलाईन पाठवताना शहानिशा कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. Baramati News