Baramati News : बारामती, (पुणे) : खाजगी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या युवकाचा भरधाव हायवा डंपरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०७) सायंकाळी बारामती येथील प्रशासकीय भवनासमोरील रिंगरोड परिसरात हि घटना घडली आहे.
बारामती येथील प्रशासकीय भवनासमोरील रिंगरोड परिसरात घडली घटना
तेजस विजय कासवे (वय – २१) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस कासवे दोन दिवसांपूर्वीच आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. दवाखान्यातून उपचार घेऊन घरी जाताना आई व मुलाचा अपघात ; अपघातात मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी.दवाखान्यातून उपचार घेऊन घरी जाताना आई व मुलाचा अपघात ; अपघातात मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी. (Baramati News) डॉक्टरांनी काल त्याच्या नाकावर यशस्वी शत्रक्रिया केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक ते उपचार करून आज रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर तेजस आणि त्याची आई हे आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, बारामती येथील प्रशासकीय भवनासमोरील रिंगरोड परिसरात आले असता भरधाव वेगात आलेल्या हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तेजसचा जागीच मृत्यू झाला. (Baramati News) तर आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खाजगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.