Baramati News : बारामती : निरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट इनग्रेव्हीया कंपनीमध्ये कॉम्प्रेसरवर काम करत असताना अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात चार कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अॅसिड कॉम्प्रेसर प्लांटमध्ये स्वच्छता करत असताना घडली घटना
दरम्यान, या अपघातातील एका कामगाराची प्रकृती गंभीर झाली असून, अधिक उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Baramati News) अॅसिड कॉम्प्रेसर प्लांटमध्ये स्वच्छता करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जखमींपैकी तिघांना लोणंद (ता. खंडाळा) येथे तर एकाला पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. (Baramati News) दोन वर्षांपूर्वी कंपनीत झालेला अपघात जीवावर बेतणारा ठरला होता. त्यानंतर शनिवारी (ता. २) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर म्हणाले की, कंपनीत लाईनची नियमित देखभाल करत असताना ही घटना घडली आहे. (Baramati News) यात तिघे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामती-वालचंदनगर रस्त्यावर झालेल्या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू..
Baramati News : बारामतीत उभारणार २०० कैदी क्षमता असणारे नवे कारागृह