Baramati News : येरवडा : बारामतीत दोनशे कैदी क्षमता असणारे नवीन कारागृह बांधले जाणार आहे. त्यामुळे दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील कैद्यांना येरवडा कारागृहात न आणता नवीन कारागृहात ठेवले जाईल. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या संख्येचा वाढता ताण कमी करण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांना तालुक्यातील कोर्टात तारखेला हजर करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वेळ देखील यामुळे वाचण्यास मदत होणार आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहावरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
बारामती तालुक्यात नवीन कारागृह उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या मागे असणाऱ्या ८९ गुंठे जागेत नवीन कारागृह उभारले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला सुरुवात झाली आहे. (Baramati News) यामध्ये १५० पुरुष आणि ५९ महिला कैद्यांचा समावेश असणार आहे. कारागृह महानिरीक्षक (विशेष) जालिंदर सुपेकर यांनी बारामतीचा दौरा करून कामाचा आढावा घेतला. नवीन कारागृहाशेजारी अधिकारी आणि कर्मचारी वसाहत बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.
बारामतीचे नवीन कारागृह कार्यरत झाल्यावर बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील कैदी या कारागृहात ठेवले जातील. (Baramati News) येत्या दोन वर्षांत कारागृहाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती कारागृह महानिरीक्षक (विशेष) जालिंदर सुपेकर यांनी दिली.
बारामतीतील कारागृहाची ठळक वैशिष्ट्ये
– ८९ गुंठे जागेवर उभारणी
– २०० कैद्यांची क्षमता (पुरुष १५० आणि महिला ५०)
– २५ कोटी निधी मंजूर, त्यापैकी सध्या १५ कोटी मंजूर
– बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील कैदी ठेवणार
– येरवडा कारागृहावरील कैद्यांचा ताण कमी होणार
– येत्या दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : सायकलला १६ आरसे अन् ८ इंडिकेटर; बारामतीतील ७५ वर्षीय अवलियाचे अनोखे सायकलप्रेम!