बारामती : Baramati Bribe – कंट्रोल रूमला तक्रार करून त्या तक्रारीचा वारंवार फॉलोअप घेतो. (Baramati Bribe) या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेचा गैरवापर होत आहे. असे सांगून तक्रारदाराकडे लाचेची माागणी करून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती (Baramati Bribe) शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.२१) रंगेहाथ पकडले आहे. (Baramati Bribe)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
संतोष जगन्नाथ पवार (पद-पोलीस शिपाई) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी पुणे येथील पोलीस कंट्रोल रूमला तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदार तक्रारीचा नेहमी फॉलोअप घेत होते. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेचा गैरवापर होत आहे. असे सांगत त्याचा दंड म्हणून पोलीस कर्मचारी संतोष पवार याने ३ हजार १५० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार विभागा सापळा रचला. तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले. आरोपी पवार यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कामगिरी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, पोलीस शिपाई सुराडकर, चालक पोलीस नाईक गोसावी यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bribe : लाचेपोटी आयफोनची मागणी करणाऱ्या पोलिस निरीक्षकास एसीबी कडून अटक….!