सासवड : श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे दि. १३, १४, १५ असा तीन दिवस श्री दत्त जयंती सोहळा होणार आहे. या दरम्यान सासवड-कापूरहोळ मार्गे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी केल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली. श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजन्म सोहळा परमपूज्य श्री श्री श्री सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य टेबे स्वामी तथा पोपट महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस दत्तजयंती सोहळ्यानिमित्त बैठकीचे आयोजन केले होते.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, नायब तहसीलदार संदीप पाटील, गट विकास अधिकारी पंकज शेळके, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, इंदूरचे तराणेकर महाराज, ग्रामसेवक दादासाहेब भवर, सरपंच प्रदीप बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य, विद्युत, पाणी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी सांभाळावी, अशा सूचना देण्यात आल्या.